इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महात्मा गांधी यांचे अचरण करता नाही आले तर त्यांचे एखदे गुण तरी अंगीकार करा तुमच्याच नक्कीच बदल होईल असे प्रतिपादन पुणे येथील खादी मध्यवर्ती केंद्राचे सचिव जयवंत मठकर यांनी केले.
लोहारा शहरातील लोकवाचनालय येथे महात्मा गांधी 150 वी जयंती अभियानातंर्गत संवाद यात्रा आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख म्हणुन लोक वाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे, क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष उमाकांत माळवदकर, सुरेश सुतार, न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर पांचाळ, भास्कर माने,विजय महानुर,बसवंत बंगले आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जयवंत मठकर म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यामध्ये मोबाईल वापराचा अतिरेक वाढत चालला असुन याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देऊन मोबाईलचा वापर अवश्यक तेवढाच करण्याचा सल्ला द्यावा. व महात्मा गांधी यांनी देशातील दारीद्र्य घालवण्यासाठी, स्वलंब मिळविण्यासाठी स्वदेशी वस्तुचा वापर करावा असा नारा दिला आहे. तसेच आपल्या दहा पोषाकात एक तरी पोषाक खादीचा असला पाहीजे असे यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवचरणसिंग ठाकुर व प्राचार्य दिलीप गरुड यांनी महात्मा गांधी यांच्या बालपण, तारुण्य, अहींसावादी चळवळ ते राष्ट्रपिता या त्यांच्या कार्या विषयी सविस्तर माहीती सांगितली. यावेळी विद्यार्थी, नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.