इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी एका प्रकरणात दलीत समाजबांधवांच्या विरोधात कलम 307 ची फिर्याद कशी लिहायची यासह अपशब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य केल्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र सोशल मिडियावर व्हायरल होत असून या घटनेमुळे दलित बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्या वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांना त्वरित निलंबीत करून अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा,अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडी लोहारा यांच्या वतीने तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर रिपाईचे उत्तम भालेराव, बालाजी माटे, दत्ताभाऊ गायकवाड, दयानंद खरोसे, किशोर माने, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, नेताजी कांबळे, हणमंत मस्के, किशोर भालेराव, शोभाताई मस्के, मंगलबाई कांबळे, शुक्राचार्य थोरात, युवराज सुर्यवंशी, दगडू माटे, निशिकांत कांबळे, श्रीकांत कांबळे, यांच्यासह रिपाईच्या सर्वपदाधिकारी
व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.