काकडशिवणी येथे पीआरओ ची कार्यकारीणी गठीत

मुर्तिजापुर :- तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे पब्लिक राईटस ऑरगनाईजेशन शाखेचे उदघाटन ग्रामपंचायत उपसरपंच श्री. संजय मालवे यांच्या हस्ते पार पडले. आयोजित कार्यक्रमास केंद्रीय अध्यक्ष श्री. भुषण महाजन, मुर्तिजापुर तालुकाचे अध्यक्ष सरवरबेग अहमद बेग, उपाध्यक्ष कांता सोळुंके मॅडम व टिना मॅडम उपस्थित होते. सदर संघटना ही जनसामान्यांच्या समस्या केंद्र व राज्य सरकार पर्यंत पोहचविणे व त्यांचे निराकरण करणे अशा उददेशाने काम करणार आहे. अशी माहिती मुर्तिजापुर तालुक्याचे अध्यक्ष यांनी सांगितले व काकड‍शिवणीची कार्यकारीणी घोषीत केली. याप्रसंगी प्रकाश लिंगाटे, गणेश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. पब्लिक राईटस ऑरगनाईजेशन, शाखा काकडशिवणी सौ. अंतकला संजय सिरसाट (अध्यक्ष), शेख हमीद शेख निजाम (उपाध्यक्ष), श्रीमती संगिता अरुण मालवे (सचिव), श्री. पांडुरंग रमेश घोडसाड (सहसचिव), श्री. सतिश गोविंदराव झाकर्डे (जनसंपर्क अधिकारी), श्री. दयाराम गोविंराव लिंगाटे (निरीक्षक), श्री. हिंमत गोविंदराव गवळी (संघटक) यांचा कार्यकारीणीत समावेश आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post