एकोंडी लोहारा जि.प्रा.शाळेतील शिक्षक उमेश बिराजदार यांचा नेत्रदानाचा संकल्प


  इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
 लोहारा तालुक्यातील एकोंडी लोहारा येथील जि.प.प्रा.शाळेतील प्राथमिक पदविधर शिक्षक उमेश बिराजदार यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.
या शाळेत उमेश बिराजदार  विद्यार्थांना गणित  व विज्ञानाचे धडे देत आहेत. शैक्षणिक कार्य उत्तम करीत असतानाच त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवीत जागतिक अपंग दिनानिमित्त नेत्रहिन अपंग बांधवाना जग पाहता यावे, असा चांगला उद्देश मनाशी बाळगुन दिव्यांगाना खरी मदत, समाजात जनजागृती करण्यासाठी,

 म्हणून नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करून प्रतिज्ञापत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय  लातूर येथे वैद्यकीय उपाधिक्षक डाँ.महादेव बनसोडे,  समाज सेवा अधिक्षक एस.एस.सूर्यवंशी, शासकीय वैद्यकीय महा.व रूग्णालय लातूर यांना सूपुर्द केला.
स्वता:च्या वाढदिवस निमित्ताने नेत्रदानाचा संकल्प केला होता, तो जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने पूर्ण केल्याचा आनंद बिराजदार सर यांनी व्यक्त केला. शाळेत विज्ञान कोडे, संगीत पाढा, गणिती उपक्रम, चला प्रयोग करून पाहू, सायन्स व इंग्रजी शब्द पाठांतर, वृक्षारोपण व संवर्धन,स्वच्छ वर्ग,स्वच्छ शाळा,स्वच्छतेचे संदेश इ.उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या कार्याचे लोहारा गटशिक्षणाधिकारी श्रीमती टी.एच. सय्यदा, विस्तार अधिकारी एन.टी. आदटराव डी.एम.जंगम, ए.एच.सोनकांबळे, विकास घोडके, पंडीत राठोड, सुदर्शन जावळे, मधुकर भरगंडे, राम चव्हाण, परमेश्वर शिंगाडे, सतीश जगताप, सुर्यकांत पांढरे, राम मुसांडे,अदिंनी आभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post