लोहारा/प्रतिनिधी :- जन्मभूमीत सह्याद्री फाऊंडेशन्सने सत्कार केल्याने माझ्यावर कामाची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तथा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अँड.अजित खोत अध्यक्ष आम आदमी पार्टी, यांनी केले.
सह्याद्री फाऊंडेशन्स व चाईल्ड लाईन उस्मानाबाद यांच्या वतीने आम आदमी पार्टी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपदी निवड झाल्याबद्दल अँड.अजित खोत यांचा उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. दापके देशमुख दिग्गज यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अनंत कावळे होते तर प्रमुख म्हणुन सह्याद्रि
यावेळी राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. दापके देशमुख यांनी केले. व तसेच अँड. अजित खोत यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले व गावाच्या विकासासाठ विविध योजना आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. व 1098 या टोल फ्री नंबरच्या माध्यमातून बालकांची मदत करण्याचे आवाहन केले. व बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए.डी.कदम यांनी बाल रक्षा अभियानासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सह्याद्रीचे गजानन पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास गावातील नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.