- मुर्तिजापूर आजोळ असलेले तुषार फाले लेफ्टनंट पदावर नियुक्त
मुर्तिजापूर(प्रतिनिधी) भारतीय सैन्यअकादमीच्या देहरादून येथे दि.८ डिसेंबर २१८ ला १४३(डी.ई.) कोर्सचा दीक्षांत परेड मध्ये नागपूर येथे वास्तव्यास असलेले आणि मूळचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सर्कसपूर या गावाचे रहिवासी असलेले श्री सुरेश व सौ.अर्चना फाले यांचे सुपुत्र आणि मूर्तिजापूर येथील मंगेश भाऊरावजी काळे उप अभियंता लघुसिंचन जिल्हा परिषद उपविभाग अकोला यांचे भाचे तुषार फाले यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेतकरी सुपुत्राने विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गडचिरोलीसारख्या शैक्षणिक सुविधांचा अभाव असलेल्या भागात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुषार भाले यांनी नागपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बि.ई. अंतिम वर्षाला २०१६ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची कंबाइन्ड डिफेन्स सर्विसेस ची परीक्षा दिली.बि.ई.ला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यासोबतच कंम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस मध्येे पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून सैन्यदलाच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलात परमनंंट कमिशन करिता पात्रता मिळविली. भारतीय सेनेला प्रथम प्राधान्य देत जुलै २०१७ ला देहरादून येथील इंडियन मिलट्री अकॅडमी मध्ये प्रशिक्षणाकरिता ते रुजू झाले. दीड वर्षाच्या खडतर प्रशिक्षणा नंतर दिनांक ८ डिसेंबर २०१८ ला देेेहरादुन येेेथील पासिंग आऊट परेड आटोपून भारताच्या तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च कमांडर महामहीम राष्ट्रपती यांचेकडून इंडियन आर्मीमध्ये परमनंट कमिशन मिळवून अधिकृतपणे लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली. भारतीय सैन्य अकँँदमीच्या देहरादून येथे पार पडलेल्या दिक्षांंत परेडचे प्रमुख भारतीय सेनेचे उपप्रमुख लेफ्ट.जनरल देवराज अन्बु हे होते. यावेळी ३४७ जन्टलमन कँँडेट्सना भारतीय सेनेत परमनंट कमिशन बहाल करण्यात आले.नवनियुक्त सेनाधिकार्यांनी प्रमुख अतिथीना जोरदार मानवंंदना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितावर तीन हेेलीकाँँप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. . .. विशेष म्हणजे आठ डिसेंबर २०१८ तुषार यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भारतीय सेनेकडून या पदाचा रूपात अनमोल नजराणा मिळाला .अनेक युवक अभियांत्रिकी पदवी प्राप्त करून राष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करून सुखी जीवनाची स्वप्ने रंगवत असतात परंतु त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर महत्त्वकांक्षा, चिकाटी ,परिश्रम यातून स्वप्न साकार करता येते हे तुषार यांच्या यशाने सिद्ध केले आहे .पूर्व विदर्भातील एकमेव असलेल्या तुषार यांच्या अलौकिक कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास युवावर्ग करता नवचैतन्य देणारा ठरणार आहे.