
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- असोसिएशन ऑफ इंडियन यूनिव्हर्सिटीज आयोजित 34 व्या पच्छिम विभागीय "युवा-स्पंदन" या युवा-महोस्तव स्पर्धेसाठी अक्कलकोट शहरातील डी.ए.व्ही.वेलणकर वाणिज्य महाविद्यालय येथे शिकक्षण घेणाऱ्या मयूर स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत भारताच्या पश्चिम विभागातील एकूण सात राज्यांचे जवळपास 40 विद्यापीठाचे संघ सहभाग होणार आहेत. यंदा हा महोस्तव पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे होणार आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. कीर्ती पांडे,संगीतालंकार शरणप्पा कलबुर्गी, प्रा.डॉ.सुनील पाटील, प्रा.सुमित गाडेकर, प्रा. किशोर थोरे, आकाश चव्हाण,इरेश फताटे, ओंकार पाठक, अक्षय सरदेशमुख, सूरज राउत, आदित्य जोशी, सिद्धार्थ भडकुंबे, बापूजी निंबाळकर, नितिन गिराम, महेश स्वामी आदींनी अभिनंदन केले आहे.