शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देतो — संस्थापक संजय पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता,
आशावाद विद्यार्थ्यांना चांगले जगण्याचे बळ देतो, असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक संजय केशवराव पाटील यांनी केले.
सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद व चाईल्ड-लाईन यांच्या वतीने शहरातील जय
तुळजाभवानी शि.प्र.मंडळ संचलित, सावित्रीबाई फुले प्राथ.विद्यालय व नविन माध्य. विद्यालय, काझी पट्टा, या शाळेत चाईल्ड-लाईन यांच्या वतीने 1098 या टोल फ्री नंबरची जनजागृती व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांना सन्मानपत्र वितरण सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
 यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्रीचे फाऊंडेशन्सचे संस्थापक डॉ.दापके-देशमुख दिग्गज, बाल
कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, मुख्याध्यापिका श्रीमती एम.डी.बदाले, सह्याद्रीचे कार्याध्यक्ष गजानन पाटील, अनिल जाधव, भोसलेसर, चव्हाण सर, निकम सर, अदि, उपस्थित होते.
 यावेळी सह्याद्रिचे संस्थापक डॉ.दापके देशमुख दिग्गज म्हणाले कि, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण व सुप्तगुण ओळखुन त्यांच्या व्यक्तीमत्वाला योग्य आकार द्यावे,असे सांगीतले. व तसेच यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए.डी. कदम यांनी शासनाच्या बाल रक्षा अभियानाविषयी सविस्तर  माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.एस.गायकवाड यांनी केले तर आभार ए.डी. गाडेकर यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post