मुर्तिजापूर प्रतिनिधी :- बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या दीन-दलित, पददलित जनतेला जातीव्यवस्था आणि अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर काढून सत्यधर्म शिकविणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने समस्त बहुजनांना मानाचे स्थान प्राप्त झाले. यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करून उघडे करुन दिले.
महिलावर्गाला आपल्या कार्याने प्रकाशित करण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्या जयंतीदिनी दिनांक ३ जानेवारी रोजी महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधुन सुप्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक सुषमा अंधारे यांचे "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काल आणि आज" या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत आहे मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मैदान शिवाजीनगर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता प्राध्यापक सुषमा अंधारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम समाजाकरता ठेवण्यात आलेला आहे तरी या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला श्रीकृष्ण बोळे, गजानन बोचरे , प्रवीण टाक, जगदीश मारोटकर, श्रीकांत भोपळे. देवानंद मोंढे,निलेश मेहरे, किशोर टाक, देवेंद्र मानकर, आशिष नीलकंठ, संदीप काळपांडे, प्रशांत, दीपक जाधव, जगदीश तायडे, संजय उमक यांची उपस्थिती होती.