शिक्षण महर्षि सुभाषदादा कोळगे पतसंस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरात शिक्षण महर्षि सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या 2019 वार्षिकदिनदर्शिकेचे प्रकाशन दि.31 डिसेंबर  रोजी संस्थेच्या समर्थनगर येथील कार्यालयात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा जिल्हा मिडिया अध्यक्ष तथा उस्मानाबादजिल्हा मराठी पञकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उस्मानाबाद तालुका सहाय्यक निबंधक बी एच सावतर, ज्येष्ठ पञकार तथा दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी राजाभाऊ वैदय, दैनिक समय सारथीचे कार्यकारी संपादक संतोष जाधव, जनता दल(से) युवा जिल्हाध्यक्ष सतीश गुंड, दैनिक संघर्षचे सहसंपादक सुभाष कदम पाटील, दैनिक संघर्षचे व्यवस्थापक संतोष कोकीळ नवाब मोमीन, अदि उपस्थित होते.
 यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास कोळगे यांनी स्वागत करून आभार मानले.
 या कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक शाम गंगावणे, अर्जुन राऊत, वैशाली जोशी, शाम शेरखाने, श्रीकांत काशिद, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post