इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जि.प. शाळेत आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन साजरा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर शिंदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विनायक गरगडे,
मुख्याध्यापक विकास घोडके, कालींदा मत्ते, मनिषा गोरे, शैला गोरे, अदि उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके यांनी अल्पसंख्यांक दिनाचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शालेय पोषण आहार अल्पसंख्यांक कर्मचारी हमीद मुजावर, रईसा मुजावर, आयान मुजावर, जोया मुजावर, रईस मुजावर, अनिसा मुजावर, यांचा
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हमीद मुजावर यांनी माझा अल्पसंख्यांक म्हणुन सहपत्निक सत्कार केला हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे असे सांगीतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतीश माने यांनी केले तर आभार विकास घोडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.