इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अवयव आणि देहदान महासंघ, मुंबई यांच्या वतीने मराठवाडा 3 या पदयात्रेचे आयोजन ग्रामीण भागातील जनतेमध्ये अवयव दानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने करण्यात आले आहे.
ही पदयात्रा दि. 22 डिसेंबर रोजी उस्मानाबाद शहरात येत आहे.
या पदयात्रेत संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम पवार व चिटणीस सुधीर बागाईतकर येणार आहेत. यानिमित्ताने सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने शहरातील कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे बिल गेट्स कॉलेज येथे सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांसाठी अवयव दान समज / गैरसमज याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहान सह्याद्रि फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज यांनी केले आहे.