इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व माजी सैनिक दयानंद किसन पवार यांच्यासोबत गोकुळ चिकुंद्रे, महेश पवार, मनोज पवार, राहुल मुगळे, अजित मुगळे, प्रशांत मुगळे, शिवाजी घंटे, अभिमान पवार, सम्राट पवार, मनसे व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यक्रत्यांनी भाजपा कार्यकारणी सदस्य तथा लोकसभा संयोजक नितीन काळे व जि.प.अर्थ व बांधकाम सभापती अभय भैय्या चालुक्य व तालुका अध्यक्ष माधव पवार यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा लोकसभा सयोंजक नितीन काळे, जि.प.अर्थ व बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य, भाजपा तालुकाध्यक्ष माधव पवार (उमरगा), भाजपा तालुकाअध्यक्ष विक्रांत संगशेट्टी (लोहारा), जि.प.सदस्य दिग्विजय शिंदे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड (उमरगा), नगरसेवक अरुण इगवे, भाजपा तालुका सरचिटणिस सिद्धेश्वर माने, विठ्ठल चिकुंद्रे, मेजर प्रताप पवार, प्रदिप सांगवे,अदि उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दयानंद पवार यांना माजी सैनिक सेल च्या तालुका प्रमुख पदावर नियुक्त करून भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.