लोहारा/प्रतिनिधी :- स्पर्धा परिक्षेत यश मिळवायचे असेल तर वेळेचे नियोजन हवे, सहा तास विद्यार्थी महाविद्यालयात राहतो तर अठरा तास तो बाहेर रहतो. या आठरा तासतल्या सहाच तास अभ्यास करा तूम्हांला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तसेच पालकांनी दररोज आपल्या पाल्यांच्या वहया चेक कराव्यात. तुम्हांला कळो या न कळो यामुळे पाल्यांवर पालकांचा धाक राहिल. कारण तूम्ही बँकेत किती पैसे ठेवलात, किंवा किती जमीन विकत घेतलात यावरून तुमच्या श्रीमंतीचे दिवस संपले, आपले पाल्य हिच खरी श्रीमंती आहे. त्यासाठी प्रयत्न करा, प्रयत्नांती यश मिळतेच, असे प्रतिपादन उपप्राचार्य रजनीकांत गरुड ( देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद ) यांनी केले.
लोहारा शहरातील देवगिरी ग्लोबल अकँडमी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणुन ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डि.एस.बिराजदार होते तर प्रमुख म्हणुन प्राचार्य विवेकानंद पाटील ,भालचंद्र जाधव ( रजिस्टार ), प्रा.काळे, प्रा.प्रविण मापवार, वैजिनाथ पाटील,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.यशवंत चंदनशिवे व सुत्रसंचालन प्रा.पल्लवी कलशेट्टी यांनी केले तर आभार प्रा.सौ.उमा हालकुडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शिवराज मानेगोपाळे, प्रा.सौ.अम्रता दिक्षित, प्रा.सौ. रत्नमाला पवार, प्रा.सौ.मधुमती पाटील, प्रा. प्रकाश जोमदे, बालाजी जगताप, कु.आकाश स्वामी, कु.स्नेहल पाटील, कु.आरती पाटील, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.