नगर शिक्षण विकास मंडळ मुरुमच्या सचिवपदी व्यंकटराव जाधव याची निवड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील नगर शिक्षण विकास मंडळाच्या नुतन सचिवपदी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात  दि.21 डिसेंबर रोजी औसाचे आ.बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत  एकमताने हि निवड करण्यात आली.

या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष रामकिशन मालपाणी, संचालक डॉ.सतिश शेळके, राजू भोसगे, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार आदीं, उपस्थित होते.

या वेळी आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते व्यंकटराव जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्यांच्या निवडीची बातमी कळताच संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post