इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा येथील समाज विकास संस्थेचे कार्यवाह यांनी भुमिपुत्र वाघ यांनी आत्मचरित्र लिहून प्रकाशित केले. यांना नळदुर्ग येथील परिवर्तन सामाजिक संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे.
परिवर्तन सामाजिक संस्थेच्यावतीने दि.22 डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे मराठवाडा लोकविकास मंच प्रमुख विश्वनाथ तोडकर व वात्रटिकाकार सूर्यकांत डोळसे अदि मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती बनसोडे यांनी दिली.
भूमिपुत्र वाघ यांनी आयुष्यभर सामाजिक काम करताना जे अनुभव आले ते अनुभव बोलक्या स्वरूपामध्ये या वाटसरु रेखाटले आहेत. यांना पुरस्कार मिळाल्याबध्दल यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.