सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठीची पुढील कार्यवाही तातडीने करून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे — आ.सुजितसिंह ठाकुर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठीची पुढील कार्यवाही तातडीने करून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
 भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दि.20  डिसेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोलापूर — तुळजापूर — उस्मानाबाद या 80 कि.मी. लांबीच्या नविन रेल्वे मार्गाच्या 2018 – 2019 च्या नियोजनामध्ये समावेश करून प्रलंबित मागणीला हिरवा कंदील दिल्याबद्दल आभार व्यक्त करून या मार्गाचे काम लवकर सुरु करण्याची कायर्वाही व आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

 तुळजापूर हे महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे तुळजापूर वगळता रेल्वे मार्गाने जोडले गेले आहेत.श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा,आंध्रा तसेच देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. उस्मानाबाद जिल्हा हा निधी आयोगाच्या देशातील तसेच महाराष्ट्रातील चार आकांशित (आतीमागास) जिल्ह्यापैकी एक असून या नविन रेल्वे मार्गामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल,असे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल याना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हे सोलापूर-तुळजापूर
-उस्मानाबाद या नविन रेल्वे मार्गासाठी अत्यंत सकरात्मक असून लवकरच या रेल्वे मार्गाचे भूमिपूजनहोऊन काम चालू होईल,असा विश्वास आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सतत या रेल्वे मार्गाचे काम चालू करण्यासाठी पाठपुरावाकरीत असल्याचे सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post