इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील महेबुब सुभानी यांच्या उरुसास प्रारंभ झाला आहे. या उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी संदलची गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यानंतर महेबुब सुबानी दर्ग्यात भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे व समाजसेवक अन्वर भैय्या शहा यांच्या हस्ते संदल व चादर चढविण्यात आली. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले. हा उरुस यशस्वी करण्यासाठी उरुस कमिटी अध्यक्ष राजु पांढरे, अस्लम आत्तार, रसुल आत्तार, राजु मुल्ला, रमजान पठाण, आल्ताफ मुल्ला, पैगबर पटेल, अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.