लोहारा तालुका विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडचे दुहेरी यश


 इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील आष्टा,(का) येथे झालेल्या "प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) नागपूरच्या वतीने 13 वे  राज्यस्तरीय आयोजन "निवडीकरिता अध्यापक  निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा व  2018 — 2019 चा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मेळावा घेण्यात आला. यामध्ये लोहारा तालुक्यातील खेड शाळेने दुहेरी यश संपादन केले.
                 या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती एम.एल.चव्हाण यांनी लोकसंख्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांक मिळविला आहे तर शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक गटात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे .श्रीमती चव्हाण यांनी मनोरंजनातून गणित शिकणे सोपे करण्यासाठी मूळ संख्या ओळखणारी जादूची छडी, जादूची बांगडी तसेच अक्षरा पासून विविध शब्दनिर्मितीसाठी त्रिमितीय साधने स्वतः तयार केले. जादूच्या छडीने विद्यार्थी आवडीने हाताळणी करत त्यांच्यासाठी एक नवीन औत्सुक्याचे साधन होते.
 या यशाबद्दल जि.प. उपाध्यक्षा श्रीमती अर्चना ताई पाटील, पं.स. सभापती अश्विनी ताई पाटील,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे ,सहाय्यक गटविकास अधिकारी जास्मिन शेख , गटशिक्षणाधिकारी तबसुम सय्यदा मॅडम, लोहारा बीटचे विस्ताराधिकारी दत्तप्रसाद जंगम, एन.टी. अादटराव, एम.जी. वाघमोडे, श्रीमती  मैंदर्गी मॅडम, केंद्रप्रमुख राम  चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, शाळेचे मुख्याध्यापक  इंगळे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  पांडुरंग  गव्हाळे, खेडचे सर्व ग्रामस्थ व शाळेच्या शिक्षक वर्गाकडून श्रीमती चव्हाण एम.एल.यांचे कौतुक  केले  आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post