इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गरजू कर्णदोष असणाऱ्या व्यक्तीला सह्याद्री मोफत श्रवणयंत्र देणार, असे प्रतिपादन डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.
सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्स उस्मानाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी येथे कर्णदोष असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख म्हणुन सोसायटीचे चे चेअरमन कालीदास सुर्यवंशी, भास्कर मुडबे, उमाकांत सुर्यवंशी, भाऊराव पाखरे, छोटुमियां सय्यद, सह्याद्रीचे प्रशासकीय अधिकारी संतोष पवार,
अदि,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्रीचे समन्वयक राजेंद्र कापसे यांनी केले तर व आभार आबासाहेब शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक, महिला, युवक, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.