- विविध संघटनांची स्वीकारली निवेदने
- रेल्वे स्टेशनला दहा हजाराचे रोख बक्षीस
- रेल्वे स्टेशनच्या विविध विभागांना देखील मिळाले बक्षीस
मुर्तीजापुर :- मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांच्या नेतृत्वात आज सकाळी बडनेरा येथून जवळपास एक हजार अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह अकरा वाजता विशेष रेल्वेने मुर्तीजापुर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. महाव्यवस्थापक डी के शर्मा यांचे स्वागत मुर्तीजापुर रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक नरवाडे यांनी केले. त्यानंतर महाव्यवस्थापक शर्मा यांनी रेल्वेच्या कँरेजन वॅगन विभागाला भेट देऊन तेथील प्रात्यक्षिकांचे निरीक्षण केले.
आणि या विभागाला अवार्ड घोषित केला. त्यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाची पाहणी केली. अशाप्रकारे अधिकारी आणि कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त यांच्यासह त्यांचे आगमन झाले होते. विविध विभागांची पाहणी केल्यानंतर येथील मुख्य कार्यालय अधीक्षक मोहरिर यांना कार्मिक विभागाचे आव्हाड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विशेष कक्षात विविध संघटनांचे तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत मूर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी केले व विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच भाजप पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष भारत भगत व सतीश चन्द्र शर्मा यांनी देखील त्यांचे स्वागत केले व निवेदन दिले. नगर परिषदेच्यावतीने सौ.मोनालीताई गावंडे व कमलाकर गावंडे यांच्यावतीने सत्कार करून निवेदन देण्यात आले.
मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे राम कोरडे. रवी राठी, जावेदखान व इतर पदाधिकारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी यांनीदेखील निवेदन दिले. येथील शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश दुबे यांच्या विनंतीवरून महाप्रबंधक शर्मा यांनी विशेष रेल्वे डब्यातून खाली उतरून त्यांच्याशी चर्चा केली. नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी देखील विविध मागण्यांचे निवेदन दिले मुर्तीजापुर पत्रकारांच्या वतीने विकास सावरकर, दिलीप देशमुख, दीपक अग्रवाल, प्रा.अविनाश बेलाडकर, विलास नसले, संतोष माने, उमेश साखरे, अंकुश अग्रवाल, निलेश सुखसोहळे, जयप्रकाश रावत, प्रा.एल.डी.सरोदे, नरेंद्र खवले, चंदन अग्रवाल, मोईज शेख, अथरखान,विशाल नाईक,बबलू यादव, शाम काकडे तसेच मुर्तिजापूर स्वच्छता अभियान कडून सुरेंद्र भेलोंडे, ज्ञानेश्वर भड,विलास वानखेडे, भारत होटे,सौरभ खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. व मागण्यांचे निवेदन दिले प्रवासी संघटनेच्या वतीने बबलू भेलोंडे, राम जोशी,अँड. त्र्यंबक येदवर, नितीन टाले यांनी निवेदन दिले.
ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देखील निवेदन देण्यात आले असून यामध्ये शकुंतला नँरोगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करून अचलपूरच्या पुढे मध्यप्रदेश पर्यंत आणि यवतमाळ च्या पुढे आंध्रप्रदेश पर्यंत रेल्वे लाईन वाढविण्यात यावी या मागणीचे सह हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेस क्र.12859, पुरी- अहमदाबाद एक्सप्रेस क्र.18405, नागपूर- अमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस क्र.12137, नागपुर- पूणे एक्स्प्रेस क्र12136, अमरावती-तिरुपती एक्सप्रेस क्र.18405, आजाद हिंद हावडा- पुणे एक्स्प्रेस क्र.12130 या गाड्यांना मुर्तीजापुर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा. तसेच ऑटो स्टँडच्या जागेचा प्रश्न निकाली काढावा,अमरावती- सुरत एक्सप्रेस दररोज चालविण्यात यावी, मुर्तीजापुर रेल्वे टेशन टर्मिनस स्टेशन बनविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाप्रबंधक यांनी यावेळी सर्वांशी सकारात्मक चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जवळपास एक तासानंतर त्यांची रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली.