दक्षिण जेवळी ग्रा.पं.हद्दीत 14 व्या वित्त आयोगातील रस्ता मजबुतीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे — शिवसेना युवा सेना तालुका उप प्रमुख शिवराज चिणगुंडे


इकबाल  मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्राम पंचायत हद्दीत 14 व्या वित्त आयोगातील रस्ता मजबुतीकरणाचे काम मंजुर आराखड्या प्रमाणे होत नसुन निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रारी निवेदन शिवसेना युवा सेना तालुका उपप्रमुख शिवराज चिणगुंडे यांनी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांना दिले आहे.
 या निवेदनात म्हटले आहे की,या कामाबाबत गावातील कांही नागरीकांनी तक्रार केली होती. व सबंधीत अभियंता यांना वारंवार तोंडी सुचना दिल्यानंतर दि.30 नोव्हेंबर रोजी सहाय्यक अभियंता यांनी सबंधीत ठेकेदाराला खडी कमी आहे. खडी
पुर्णपणे टाकुन आमच्या अभियंता यांना दाखवुन मुरुम टाकुन दबई करुन घ्या,असे सांगुन सबंधीत ग्राम पंचायतीला लेखी पत्र काढुन मि सुचना देतो असे, सांगीतले. हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे,असे ग्राम सभेमध्ये जनतेने ठराव घेतले आहे.तरीही काम सुरुच होते. सबंधीत ठेकेदार मनमानी करुन दि.4 डिसेंबर रोजी त्या कामावरती मुरुम टाकुन काम पुर्ण केल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सबंधीत कामाचे बिल काढण्यात येवु नये,असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिवसेना युवा सेना तालुका उपप्रमुख शिवराज चिणगुंडे,ग्रा.पं.सदस्य सुभाष सिदण्णा कोरे,
अंबिका अशोक बिराजदार, दयानंद जाधव, प्रमिला कोरे, प्रकाश होनाजे, संजय कारभारी, परमेश्वर बिराजदार, सुभाष बिराजदार, मल्लीनाथ कारभारी, दिलीप कोरे, बाबुराव कारभारी, सातलींग उपासे, शिवलिंग कोरे, संभाजी गुंजोटे, सुधीर सुभाष कोरे, विकास बिराजदार, अदिंच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post