इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील ग्रामदैवत खंडोबा देवाची दि.8 डिसेंबर रोजी पहाटे गावकऱ्यांच्यावतीने महाआरती आणि अभिषेक करून यात्रेला सुरुवात करण्यात आली.
कनगरा येथे मागील तीन चार वर्षांपासून येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून यावर्षी येथील नागरिकांनी, कुस्त्या, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, पशु प्रदर्शन आशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाआरती व अभिषेक झाल्यानंतर देवाच्या मूर्तीची आणि पालखीची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील नागरिकांनी विविध देवदेवतांच्या वेषभूषा परिधान करून देखावे सादर केले होते. हलक्याच्या निनाद मध्ये वारू, ढोलकरी आणि पालकीची शोभा वाढविली होती,
दि 9 डिसेंबर रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान भरगच्च कुस्ती स्पर्धेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आली आहे. यामध्ये पंचक्रोशीतील पैलवान व भाविक भक्तांनी सहभाग नोंदवावा असे,
आवाहान कनगरा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.