इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील आष्टा(कासार) हायस्कुल येथे वर्गमित्र 1983 - 84 ग्रुपच्यावतीने 35 वर्षानंतर क्लासमेंट ग्रुपच्यावतीने स्नेह मिलन कार्यक्रम घेण्यात आला.
हा कार्यक्रमासाठी कमलाकर मोटे, दत्तात्रय सावंत, गोविंद काटे, राहुल गायकवाड, प्रा. बालाजी बेंडकाळे(जाधव), काशिनाथ चव्हाण, अशोक सोमवंशी, आणप्पा शिदोरे, शाहुराज पाटील, दिलीप चौधरी, संगिता गडगडे, सुनिता आष्टेकर, नयना मनाळे, साधना सोमवंशी, फुंड्डीपल्ले यांनी व्हाॅटसअॅप,फोनव्दारे वर्गमित्रांना संपर्क साधुन "स्नेहमिलन सोहळा संपन्न केला."पुन्हा एक दिवस शाळेचा"प्रत्यक्ष परिपाठ, प्रतिज्ञा,प्रार्थना, संविधानाने सुरुवात करण्यात आली.दिवंगत गुरुजन,वर्गमित्रांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनानंतर तत्कालिन गुरुजन, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, साहित्यीक, वकील, समाजसेवक, इंजिनिअर, शेतकरी, उद्योगपती, यांचा शाल,फेटा,भेट वस्तु देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विष्णु सगर, शंकर स्वामी, लक्ष्यमन मुळे, आंबादास चौधरी, अॅड.सयाजी शिंदे, अँड.विरसंगप्पा (तात्या) आळंगे, मनोहर वाघमोडे, सुभाष वैरागकर, गोविंद काजळे (मुख्याध्यापक आष्टा), सरीता उपासे(स्वागताध्यक्ष,राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलन), प्रा.गौतम गायकवाड, कमलाकर चौधरी या गुरुजनांनी जुन्या आठवणींना उजाळा देवुन ख्याली, खुशालीचा आढावा घेत संवाद साधला. वर्गमित्रांनी संसार करत प्रगती कशी साधली याविषयी मनोगत व्यक्त केले. स्वादिष्ट भोजनानंतर दुपारच्या सत्रात परीचय सत्र, मनोगत व भुतकाळातील आठवणींना उजाळा देत विविध विषयावर खुली चर्चा, शिक्षकांच्या आठवणी, त्यांनी शिकवलेले अवघड पाठ, खेळत-बागडत वर्गात केलेल्या खोड्यापासुन महाविद्यालयीन शिक्षण,करीअर घडविण्यासाठी मदत, नोकरी व व्यवसायाला लागलेला हातभार इ.आठवणी काढुन प्रत्येकांचे डोळे पानावले.
यावेळी पुरुषांनी कबड्डी तर महिला संगीत खुर्ची,लंगडी,दांडिया यासारख्या मैदानी खेळांचा पुन्हा आनंद घेतला. पुन्हा भेटण्याचे वचन एकमेकांना देत निरोप घेताना अनेंकाना गहिवरुन आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाॅदपाशा खैराटे, राजेंद्र काळे, महादेव आल्लीशे, महादेव सोमवंशी, सुधाकर पाटील, अदि, वर्गमिञांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालाजी बेंडकाळे व सुत्रसंचलन बबिता महानुर यांनी केले.तरआभार दत्ता सावंत यांनी मानले.