इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अनेक वेळा एखाद्या रूग्णाला कुठलातरी अवयव आवश्यक असतो, पण तो वेळेत न मिळाल्याने त्याचा म्रुत्यु होतो, असे होऊ नये यासाठी नागरीकांनी देहदान चळवळीत सहभागी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन अवयव आणि देहदान महासंघ, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी केले.
अवयव दान आणि देहदान च्या प्रचारासाठी पदयात्रा उस्मानाबाद शहरात आली होती. या निमित्ताने अवयव व देहदान महासंघ मुंबई व सह्याद्रि फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्यावतीने शहरातील बील गेटस कॉलेजमध्ये दि. 20 डिसेंबर रोजी समज / गैरसमज याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्रि फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज होते. तर प्रमुख म्हणुन अवयव आणि देहदान महासंघ मुंबईचे सचिव सुधीर बागाईतकर, बील गेट्सचे प्राचार्य रिजवी सर, अंजुमन हेल्थकेअर व वेलफेअर सो.चे संस्थापक फिरोज पल्ला, पटेल सर, जमाले सर,अदि उपस्थित होते.
यावेळी सुधीर बागाईतकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सह्याद्री फाऊंडेशन्सचे संस्थापक व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. दापके देशमुख दिग्गज यांनी अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले कि, अवयव दान जागृती मुळे मरन्नाअवस्थेत असलेल्या अनेक रूग्नांना जीवनदान मिळेल व सह्याद्री फाऊंडेशन्स अशा सामाजिक कार्यात अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन पाटील व सुत्रसंचालन शेळके मँडम यांनी केले तर आभार लांडगे सर यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.