डॉ.भाग्यश्री म्हेत्रे सुवर्णपदकाची मानकरी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद पाटबंधारे विभागात कार्यालयात कार्यरत असलेले प्रदीप म्हेत्रे यांची कन्या डॉ.भाग्यश्री म्हेत्रे हिने आयुर्वेदामध्ये सुवर्णपदक पटकावले असुन नुकत्याच झालेल्या दिक्षांत समारंभात तिचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे  दिक्षांत समारंभ झाला. यावेळी कुलगुरु प्रा.डॉ.मोहन खामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केज येथील आयुर्वेद महाविद्यालयात बी.ए.एम.एस (एम.एस. शालाक्य तंत्र) (नेत्ररोग) अभ्यासक्रम पुर्ण करुन डॉ.भाग्यश्री प्रदीप म्हेत्रे हिने सुवर्णपदक पटकावले. नाशिक येथे झालेल्या दिक्षांत समारंभ डॉ.भाग्यश्री हिस सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अन्य मान्यवरांची ही उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post