
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद व चाईल्ड-लाईन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील समता नगर मधील नगरपरिषद शाळा क्र.11 मधील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. व 1098 या टोल फ्री नंबरची जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प.विरोधी पक्ष नेते युवराज नळे होते. तर प्रमुख म्हणुन नगरसेविका सौ.सुनीता दिपकराव साळुंके, सह्याद्रीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज, पत्रकार पांडुरंग पवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप साळुंके, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, अदि, उपस्थित होते. यावेळी सह्याद्रीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज यांनी चाईल्ड लाईन या संस्थे बद्दल माहिती सांगुन, 1098 हा टोल फ्री नंबर पाठ करण्याचे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सह्याद्रीचे गजानन पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक के.बी. वाघोलीकर यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.