इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भाजप सरकारने सत्तेवर येताच 4 वर्षात क्रांतीकारी, ऐतिहासिक निर्णय घेत मराठा समाजास आरक्षण दिले. राज्यात यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी सत्तेत होती. त्यांनी स्वत:चा विकास करून घेतला. परंतु समाज उपेक्षीत ठेऊन मराठा समाजास देशोधडीला लावण्याचे काम या मंडळीनी केल्याची घणाघाती टिका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केली.
भाजप सरकारने शिक्षण व नोकरीत मराठा समाजास 16 टक्के आरक्षण दिल्याबद्दल आ.ठाकूर यांचा उस्मानाबाद येथे दि.15 डिसेंबर रोजी जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी होते. तर प्रमुख म्हणुन भाजप प्रदेश
कार्यकारणी सदस्य नितीन काळे, रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक चेअरमन ॲड. व्यंकट गुंड, ॲड.अनिल काळे, ॲड.ख़ंडेराव चौरे, एस.पी. शुगर्सचे चेअरमन सुरेश पाटील, भूम न.प.चे गटनेते संजय गाढवे,भाजप मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, ॲड. रामभाऊ गरड, डॉ. घोगरे,अदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.ठाकूर म्हणाले की, मराठा समाजास आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच घेतला. हा निर्णय घेण्यासाठी मागास आयोगाचा अहवाल लागतो, हे माहित असताना देखील विरोधक विशेष आधिवेशनाची मागणी करत होते. अधिवेशन घेतले तर गोंधळ घालून काम बंद पाडत होते. आरक्षणाच्या मुद्यावर यांनी खोडा घातला. दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठा समाजाने भाजप सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून विरोधकांना खड्यासारखे बाजूला सारल्याची टिका करून आ. ठाकूर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. भाजप सरकार प्रामाणिक व पारदर्शक कारभार करीत आहे. विदर्भ व मराठवाड्यास पूर्वीच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत केवळ 17 टक्केच लाभ मिळाला. त्यांनी कर्जमाफीतही पैसे लाटल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन याद्या मागवल्या. परंतु ऑनलाईन कर्जमाफी आहे, म्हटल्यानंतर 10 लाख नावे कमी झाली. सरकार पारदर्शक कारभार करत असल्याचे सांगून धनगर समाजास भाजप सरकारच आरक्षण देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ.ठाकूर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी घ्यावी, अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी भाषणात केली होती. त्यावर बोलताना ठाकूर यांनी सावध पवित्रा घेत यावर आताच काही भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, ॲड. व्यंकट गुंड, ॲड.अनिल काळे, एस.पी.शुगर्सचे चेअरमन सुरेश पाटील, न.प. गटनेते सुरेश गाढवे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजप मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे व सुत्रसंचालन पांडूरंग पवार यांनी केले. प्रारंभी श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना शहिद झालेल्या समाजाच्या शहिदांना एक मिनीट स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास ॲड. नितीन भोसले, प्रभाकर मुळे, धनंजय शिंगाडे, डॉ.ग़ोविंद कोकाटे, दत्ता सोनटक्के, इक्बाल मुल्ला, शिवाजी गिड्डे, सुखदेव टोंपे, सचिन इंगोले,इंद्रजीत देवकते, राजेंद्र पाटील, बुबासाहेब जाधव, विष्णूपंत धाबेकर, संदीप कोकाटे, मिलिंद कुलकर्णी, राजाभाऊ बागल, राहुल काकडे, नाना घाटगे, नागेश इंगळे, श्रीकांत कदम, पार्श्वनाथ बाळापुरे, श्रीकांत कदम, संजय खुरूद, जीवन गायकवाड, दत्ता बारकुल, सुभाष कदम, संतोष खुणे, निशिकांत क्षीरसागर, ॲड. निवृत्ती कुदळे, ॲड.शरद गुंड, राजेंद्र पाटील, दिनेश बायस, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हावळे-पाटील यांचा नवसपुर्तीबद्दल सत्कार
मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी येडशी (ता.उस्मानाबाद) येथील अविनाश हावळे-पाटील यांनी तीन महिने चप्पल पाळून श्री तुळजाभवानी मातेस नवस केला होता. त्यांची नवसपूर्ती झाल्याबद्दल त्यांचा आ.ठाकूर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
लोकसभेसाठी आ.ठाकूर यांच्या उमेदवारीची मागणी
प्रस्ताविक भाषणात भाजप मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी मराठा समाजास आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप सरकारचे आभार मानले. यावेळी बोलताना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आ.ठाकूर यांनी भाजपाकडून उमेदवारी घ्यावी, अशी मागणीही श्री. रणदिवे यांनी यावेळी केली. त्यानंतर अन्य मान्यवरांनीही भाषणात आ.ठाकूर यांच्या उमेदवारीची मागणी लावून धरली.
उस्मानाबाद येथे भाजप व मराठा समाजाच्या वतीने आ. सुजितसिंह ठाकूर यांचा जंगी सत्कार करण्यात आला.