पाण्या अभावी वाळुन गेलेल्या शेतकऱ्यांचे शासनाने ऊसाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत द्यावी — लोहारा तालुका राष्टवादी कॉग्रेस



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- पाण्या अभावी वाळुन गेलेल्या शेतकऱ्यांचे शासनाने ऊसाचे पंचनामे करून नुकसानीपोटी शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी,अशा मागणीचे निवेदन लोहारा तालुका राष्टवादी कॉग्रेसच्यावतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, उस्मानाबाद  जिल्हयात पावसा अभावी अभुतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन, वार्षिक सरासरी च्या 60  टक्के पेक्षा कमि पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचे अधिकांश स्त्रोत आटले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक  पाऊस झाल्याने जिल्हयातील शेतकऱ्याना मोठ्या आशेने कर्ज काढुन ऊसाची लागवड केली होती. व पीक जोपासण्यासाठी मोठा खर्च केला होता. परंतु दुर्दैवाने अपेक्षित पाऊस न पडल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. जिल्यातील शेतकऱ्याची स्थिती अतिशय विदारक असुन 80 टक्के पेक्षा अधिक क्षेत्रात पाण्या अभावी रब्बीची पेरणी करता आली नाही, पावसातील दीर्घ खंड व कमी पर्जन्यमानामुळे खरीपाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था सर्वात जास्त वाईट झाली आहे. साखर कारखाने उशिरा चालु झाल्याने गाळपा अभावी ऊस उभा असुन पाणी नसल्याने व उन्हाचा तडाखा वाढत असल्याने उत्पादनात 50 टक्के हुन आधिक घट होत आहे. तर कांही ठिकाणी पाण्या अभावी ऊसाचे चिपाड आले असल्याने अशा शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. ऊसा साठी केलेला खर्च व उत्पादनातील प्रचंड घडीमुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील देखील गेल्या कांही दिवसांपासुन दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी जिल्हयातील विविध गावांना भेट देवुन परिस्थिती जाणून घेत आहेत. जिल्हयातील शेतकरी बांधवांची स्थिती अतिशय विदारक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची  अवस्था सर्वात जास्त वाईट असल्याचे दिसुन आल्याने त्यांनी देखिल पाण्या अभावी वाळुन गेलेल्या ऊसाचे पंचनामे यांपूर्वीच ऊसाचा पिक विमा योजने मध्ये समावेश नसल्याने एकरी 50 हजार रुपये मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. इतर शेती पिकांना विम्याची तरतुद असल्याने त्या पिकाच्या उत्पादनातील घटीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळतो परंतु शासनाने ऊसाचा पीक विमा योजनेत समावेश केला नसल्यामुळे ऊस उत्पादकांना मात्र अशा परिस्थितीत विम्याची कसलीच मदत मिळत नाही. सततच्या नैसर्गिक आपत्तीने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हयातील ऊस उत्पादक शेतकऱ्याना संकटातुन बाहेर काढण्यासाठी पाण्या अभावी वाळुन गेलेल्या ऊसाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दयावेत व पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने एकरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे. या  निवेदनावर राष्टवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष किशोर साठे, राषटवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, राष्टवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक गगण माळवदकर, अमिन सुंबेकर,कमलाकर सिरसाठ, संजय गायकवाड, महेबुब फकीर, शुभम साठे, सतिश सुर्यवंशी, साजिद मुजावर, नारायण पवार, भास्कर माने, प्रशांत हाक्के, परमेश्वर भेडगे, दिपक माने, सतिश जाधव, बालाजी पाटील, माधव पवार, तुकाराम जावळे, अशोक साठे, गणेश पाटील, चंद्रशेखर आलमले, व्यंकटराव मुळे,अदिंच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post