उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी,यासाठी केंद्र व राज्य सरकारने हक्काचे पाणी,दळण वळणासाठी सुसज्ज रस्ते,विज, कायम स्वरुपी पाणी पुरवठा,शेती विकास, वैद्यकीय महाविद्यालय, तुळजापुर तिर्थक्षेत्राला रेल्वेला जोडण्याचे प्रकल्प मंजुर केले आहे— आ.सुजितसिंह ठाकुर


इकबाल मुल्ला
लोहारा प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी केंद्र आणी राज्य सरकारने हक्काचे पाणी, दळण वळणासाठी सुसज्ज रस्ते, कायमस्वरुपी पाणी पुरवठा,शेती विकास, वैद्यकीय महाविद्यावय, तुळजापुर तिर्थ क्षेत्राला रेल्वेला जोडण्याचे प्रकल्प मंजुर केले असुन, आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देत विकासाचे राजकारण करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले.
उस्मानाबाद शहरातील जत्रा फंक्शन हॉल मध्ये
दि.13 डिसेंबर रोजी उस्मानाबाद समाचार यांच्या देवेंद्र फडणवीस सरकार चतुर्थ वर्ष पुर्ती आणी दिवाळी प्रकान सोहळा समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ.ठाकुर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, ज्येष्ठ पत्रकार राजेश साळगाव, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, अँड.अनिल काळे, अँड.नितीन काळे, जिल्हा माहीती अधिकारी मनोज सानप, संपादक देविदास पाठक,अदि, उपस्थित होते.
यावेळी आ.ठाकुर पुढे बोलताना म्हणाले कि,
मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास पर्यावरण विभागाची मान्यता, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र राज्यपालांच्या निधीवाटप सुत्राबाहेर राहुन 800 ते 900 कोटीचा निधी दिल्यामुळे तसेच नाबार्डकडुन 2200 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे चार वर्षात हक्काचे पाणी जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात 15 वर्षात झाली नव्हती तेवढी शेती पंपाना आणी घरगुती विज कनेक्शन दिली. जिल्ह्यात अकरा उपकेंद्राना मंजुरी या सरकारने दिली आहे. जिल्ह्यात राष्टीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. 20 वर्षात जेवढे रस्ते झाले नाहीत. त्यापेक्षा अधिक रस्ते चार वर्षात होत आहेत. कौडगाव एम.आय.डीसी मध्ये पायाभुत सुविधा उभारण्यात येत आहेत. वडगांव एम.आय.
डीसीसाठी 56 कोटी रुपये मंजुर झाले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करुन घेतले आहे.
आपण जे बोलतो ते करुन दाखवितो असे आ.ठाकुर यावेळी म्हणाले. जिल्ह्यात ग्रामिण भागात पाणी पुरवठ्याच्या 170 योजनांना मंजुरी मिळाली असुन मराठवाडा वॉटर ग्रिडमधुनही ग्रामिण भागाला कायम स्वरुपी पाणी मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. तुळजापुर रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्यामुळे या प्रकल्पाचेही काम लवकरच सुरु होईल. विकासासाठी जे जे करता येईल ते ते करत आहे. असे ते यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार राजेश साळगावकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांनी विधायक लेखणी चालवावी, समाजात सकारात्म भावना वाढीस लावण्यासाठी पत्रकारांनी शासन यंत्रणा आणी जनतेमध्ये दुवा म्हणुन काम करावे,असे आवाहन केले. नकारत्मकता संपावुन समाजामध्ये विकासासाठी सक्रिय होण्याला प्रवृत्त करणारी पत्रकारीता हि विकासाभिमुख पत्रकारीता अंगीकरणाची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रविण घुगे, दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड.अनिल काळे, नितीन काळे, यांनी साप्ताहीक उस्मानाबाद समाचारच्या विशेषांक प्रकाशनला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट अभियानांतर्गत राज्य स्तरीय स्वच्छता जनजागृती प्रथम पुरस्कार मिळाल्याबध्दल मल्लीकार्जुन सोनवणे यांचा तसेच महाराष्ट शासनाच्या सास्कृतीक मंत्रालयांतर्गत पुरस्कार निवड समिती सदस्यपदी फेरनिवड झाल्याबध्दल सतिश महामुनी यांचा आणी अरुण इगवे यांचा उमरगा नगर पालीका स्विकृत सदस्यपदी नियुक्ती झाल्याबध्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संपादक देविदास पाठक यांनी केले. त्यात त्यांनी जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांची भुमिका महत्वपुर्ण असल्याचे सांगुन या विशेष अंकातुन विकास कामांच्या प्रकियेला गती देण्यासाठी विविध योजना जनते पर्यंत पोहचवण्यासाठी साप्ताहिक उस्मानाबाद समाचारने हा विशेषांक  काढला असल्याचे सांगीतले. प्रारंभी अध्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडुरंग पवार यांनी केले तर आभार संपादक देविदास पाठक यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार,यांच्यासह जिल्ह्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post