इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 2014 पासून ते 2018 पर्यंत 220 लोकांचा मृत्यू झाला आहे. या मयत व्यक्तीच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी,
अशा मागणीचे निवेदन बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे (मुरुम) यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दि. 07.09.2018 रोजी बसव प्रतिष्ठाण च्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्र.9 चे रस्ता काम निकृष्ठ आणि दिलेल्या कालावधीत होत नसल्याने केंद्रीय मंत्री रस्ते व वाहतूक यांना पत्र व्यवहार करून रामपूर पाटी ता. उमरगा वर आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात आले होते, दि. 08 रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आस्वासना नंतर व दि. 14 सप्टें 2018 च्या बैठकीच्या पत्रा नुसार आंदोलन मागे घेण्यात आले होते.
वरील आंदोलनात सहा मागणी पैकी राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मयत व्यति च्या परिवाराला आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांनी दि. 14 बैठीकत आस्वासन दिले व त्यासाठी ठाणे निहाय प्रस्ताव सादर करण्यास सांगितले, त्यानुसार बसव प्रतिष्ठाण च्या वतीने मुरूम, उमरगा आणि नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मयत व्यक्ती ची यादी देत असून मुरूम हद्दीत- 42, उमरगा हद्दीत-103 आणि नळदुर्ग हद्दीत-75 असे एकूण 220 व्यक्ती अपघात मयत झाले असून त्यांच्या अपघातास राष्ट्रीय प्राधिकरण राज्यमहामार्ग हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून मयत व्यक्तीच्या परिवारास जिल्हा प्रशासन या नात्याने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करून न्याय मिळवून दयावे,असे निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रस्तावाची जन हित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.