महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, रफिक यांचे वडील आदम शेख, भाऊ लखन शेख, प्रसिक्षक गणेश घुले यांच्यासह मान्यवर पैलवान उपस्थित होते.
रफिक शेख हे मुळचे खडकीचे (ता. करमाळा, जि. सोलापूर) असून त्यांनी बुलढाण्याकडून खेळताना पहिल्यांदा विदर्भाला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रफिक यांना धन्यवाद दिले. यांचे राज्यातुन सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post