लोहारा/प्रतिनिधी
सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद व चाईल्ड-लाईन यांच्या वतीने शहरातील छत्रपती शाहू शि.प्र.मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी माध्यमिक. व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांना सन्मानपत्र वितरण सोहळा व 1098 या टोल फ्री नंबरची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहु शि.संस्थेचे कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख होते. तर
प्रमुख म्हणुन सह्याद्री फाऊंडेशन्सचे संस्थापक डॉ. दापके-देशमुख दिग्गज, छत्रपती शाहु शि.संस्थेचे सचिव धनंजय पाटील,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात भाई उद्धवराव पाटील यांच्या मुर्तीस मान्यवरांच्या हस्ते हार घालून अभिवादन करून करण्यात आली.
अध्यक्षीय भाषण करताना एम.डी.देशमुख यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी 1098 हा लहान मुलांच्या मदतीसाठी असणारा 1098 हा टोल फ्री नंबर पाठ करण्याचे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन पाटील व सूत्रसंचालन आनंद वीर यांनी केले. तर आभार लांडगे सर यांनी मानले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक आर.एस. उपमुख्याध्यापक पी.एन.पाटील, पर्यवेक्षक एस.डी.गायकवाड, एन.एम.देते, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, बाल कल्याण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.