यवतमाळ :- पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाववाढ करून सर्व सामान्यन्यांना संकटाच्या खाईत टाकणाऱ्या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा यवतमाल जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला,
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात या बेजबाबदार सरकारचे निषेध करण्यात आले त्या पार्शवभूमीवर यवतमाल जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षअतुल राऊत यांच्या नेतृत्वाखाली यवतमाल जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले यवतमाळ विधानसभा व जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUI ( विद्यार्थी काँग्रेस ) यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

