येणारे सत्तेच्या चाब्या बहुजनांच्या हाती येणार: मो.तारीक लोखंडवाला


प्रतिनिधि,मक़सूद अली
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातून बहुजन समाज पार्टीने आपला वेगळा इतिहास निर्माण केला असून या विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरे नंबरच्या पक्षामध्ये बहुजन समाज पार्टी पहिल्या नंबरवर होती, बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीरामजी यांनी सत्ता कशी स्थापन करायची याचे सुत्र सांगीतले, याचा उपयोग करून येणारे निवडणुकामध्ये बसपा सत्तेची चाबी आपल्या हातात ठेवणार आहे.

राज्यात सर्वाधिक वोट बसपाचे असून राष्ट्रीय आणि राज्यातील प्रादेशिक पक्षांनी बसपाचा धसका घेतला असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मो.तारीक लोखंडवाला यांनी केले. बसचाचे वतीने बहुजन  नायक कांशीरामजी यांचा बारावा स्मृती दिवस साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.


यावेळी मंचावर बसपाचे प्रदेश सचिव पंडीत दिघाडे, जिल्हा बामसेफ संयोजक मा.आठवले साहेब उपस्थित होते व कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन डॉ. गंगाले सर यांनी केले. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा तथा यवतमाळ विधान सभा चे बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post