यवतमाळ :- ऑक्टोंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारींची बैठक झाली, यात जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते परंतु सुरूवातीपासूनच काँग्रेस कार्यकत्र्यात जिल्ह्यातील नेत्यांविषयी असंतोष दिसून आला. अनेकांनी आ.हरिभाऊ राठोड यांचे विषयी संताप व्यक्त केला.
आमदार झाल्यानंतर त्यांनी जिल्हयात पक्षसंघटनेसाठी कार्य केले नाही, त्यांनी कार्यकर्तांशी संपर्क तोडला, असा आरोप करण्यात आला. पक्षश्रेष्ठी व निरक्षकांपुढे कार्यकर्तेंनी राठोड यांचेविषयी नाराजी व्यक्त केली. सभा चालु असतांनाच नगरसेवक जावेद परवेज अंसारी यांनी मंचावरील नेत्यांना विचारणा केली की संपूर्ण देशात भाजपाविरोधी लाट असतांना यवतमाळ जिल्हा परिषदेत युती कशी?
भविष्यात होणारे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने घात असल्याचे सांगून काँग्रेस भाजप युतीमुळे अल्पसंख्याक समाज काँग्रेसपासून दुरावत असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व आमदार डॉ.मिर्झा यांनी यवतमाळ शहरात जनसंपर्क कार्यालय उघडावे जेणेकरून अल्पसंख्याक समाजबांधवांना व जिल्हयाचे केंद्रबिंदू असलेल्या यवतमाळ शहरातील समस्यांचे निराकरण करण्याचे दृष्टीने जनतेला सुविधा उपलब्ध होईल असेही यावेळी कार्यकर्तेंनी सुचविले.