भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या पाठपुराव्याला यश दुष्काळ मुल्यांकन ट्रिगर — 2 मध्ये भुम तालुक्याचा समावेश


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भूम व उमरगा तालुक्यांना ट्रिंगर २ लागू करून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी घोषित करावा,अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुल मंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांच्याकडे केली होती.
या अनुषंगाने राज्य शासनाने भुम तालुका दुष्काळ मुल्यांकन ट्रिगर 2 मध्ये समावेश केला आहे.व उमरगा तालुक्यात ट्रिगर 1 लागु होत नसल्यामुळे तेथे ट्रिगग 2 लागु होत नाही,असे उपसचिव महाराष्ट्र सुभाष उमराणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
खरीप हंगाम 2018 हंगामातील दुष्काळ मुल्यांकना मध्ये ट्रिगर 2 भुम तालुका अतिरिक्त समावेश करण्यात आला अस्याचे पत्र उपसचिव महाराष्ट्र सुभाष उमाराणीकर यांनी विभागीय आयुक्त  औरंगाबाद व कृषी आयुक्त महाष्ट्र पुणे व जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे. आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या पाठपुराव्यामुळे भुम तालुका दुष्काळ यादीत समाविष्ठ करण्यात आला आहे.यामुळे आ.सुजितसिंह ठाकुर यांचे भुम तालुक्यातुन व जिल्ह्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.उमरगा तालुका या दुष्काळ यादीत समाविष्ठ करण्यात यावा,अशी मागणी उमरगा तालुक्यातुन होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post