लोहारा तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन यांनी दररोज एक तास श्रमदान करुन तहसील कार्यालयाचा केला कायापालट


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन अशोक शिंदे हे दि.2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती पासुन माझे कार्यालय स्वच्छ कार्यालय हा संकल्प हाती घेवुन दररोज एक तास तहसील कार्यालय व कार्यालयाबाहेरील परिसर स्वच्छ करण्याचे काम करीत आहेत.कार्यालयीन वेळेव्यतीरिक्त सकाळी 7 ते 8 या वेळेत गेली पंधरा दिवसापासुन अखंडपणे काम करीत आहेत.यामुळे तहसील कार्यालयातील घाण दुर होवुन परिसराचा कायापालट दिसत आहे.
  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दि.25/9/218 रोजी लोहारा तहसील कार्यालयाला भेट दिली होती.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी कामाचा आढावा घेवुन संपुर्ण कार्यालय फिरुन अवलोकन केले.यावेळी त्यांनी परिसर स्वच्छ ठेवणे बाबत सुचना दिल्या होत्या.नव्याने रुजु झालेले तहसीलदार राहुल पाटील यांनी अव्वल कारकुन अशोक शिंदे यांना कार्यालयातील स्वच्छतेकडे लक्ष देणेबात सुचित केले होते.तहसीलदार यांचा शब्द प्रंमाण मानुन अशोक शिंदे यांनी नायब तहसीलदार रणजित शिराळकर,
नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.29 सप्टेंबर पासुन एक दिवस कार्यालयातील सर्व कोतवाल,शिपाई,लिपिक,अव्वल
कारकुन यांची टीम करुन कार्यालयातील आतील भाग स्वच्छ करुन घेतला.मात्र तहसील इमारतीच्या बाहेर जवळपास 4 एकर चा परिसर असुन या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वत्र उंच,उंच गवत उगवुन आलेले होते.प्लॉस्टीक पिशव्या,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कार्यालयातील टाकाऊ कागद याचा सर्वत्र खच पडला होता.सर्वत्र घाणीचे साम्राज होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला होता.
 यामुळे अव्वल कारकुन अशोक शिंदे यांनी माझे कार्यालय स्वच्छ कार्यालय हि संकल्पना मनात घेवुन दि.2 ऑक्टाेंबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन कार्यालयीन वेळेशिवाय दररोज एक तास कार्यालयातील स्वच्छता करायची मनात ठरवुन दररोज सकाळी 7 ते 8 वेळेत स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली.या कामास सुरु करुन पंधरा दिवस झाले.जवळपास तहसील कार्यालयाचा परिसर 50% स्वच्छ झाला असुन अजुन काम सुरु आहे.आता पर्यंत जवळपास तिन ते चार टँक्टर कचरा गोळा झाला आहे.

दर रविवारी करणार शौचालयाचीही स्वच्छता
   तहसील कार्यालयात एकुण 11 शौचालय असुन तहसीलदार कक्षातील वगळता कार्यालयातील सर्व शौचालय बंद होती.अनेक शौचालयाच्या खोल्या मोडक्या खुर्च्या,निकामी सामान व भंगार याने भरलेल्या होत्या.कांही मध्ये पाण्याची व्यवस्था नाही.
नळाचे तोट्या तुटलेल्या होत्या.पाणी नसल्याने शौचालयाची दुर्गंध सर्व कार्यालयात पसरली होती.
स्वच्छता मोहीम दरम्यान सर्व शौचालये रिकामी करण्यात आली असुन पाण्याची व्यवस्था करुन चालु करण्यात आली आहेत.मात्र कार्यालयात शौचालय साफ करण्यासाठी स्वतंत्र कामगार नसल्याने ते घान होते.त्यामुळे दर रविवारी हि सर्व शौचालये साफ करण्याचा संकल्प करुन कामाला सुरुवात केली आहे.
या कामाचे नागरीकांतुन व कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडुन कौतुक करण्यात येत आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post