इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरातील सिद्धीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेचा दि.20 ऑक्टोंबर रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे हितचिंतक सभासद ग्राहक ठेवीदार कर्जदार व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
येत्या 6 महिन्यांत संस्था स्वतःच्या जागेत स्थलांतरित होईल,संस्थेवर मोठ्या प्रमाणात सभासदांनी विश्वास दर्शवला आहे त्यामुळे संस्था प्रगती करू शकली.या वेळी आगामी काळातही संस्था सर्व सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरेल असा विश्वास संस्थेचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन बालाजी (व्यंकटेश) कोरे,संचालक सतीश सोमाणी, अँड सचिन मिनियार,बालाजी जाधव प्रमुख पाहुणे नितीन काळे,अँडनितीन भोसले संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामठे,व प्रवीण पाठक, राहुल गवळी,नाना घाडगे,दाजी आप्पा पवार,दुर्गा पवार,दत्ता लोकरे,अनिकेत काळे,पवार सर,महेश काटे,नरेंन वाघमारे,दिनेश कुलकर्णी,नवनाथ ढगे, शरद साखरे,विकास मडके,बालाजी ननवरे,कौस्तुभ दिंडोरे,राजकुमार जाधव,अरविंद गोरे,देशपांडे समर्थ, अनिल हुजरे,बालाजी सूर्यवंशी,अविनाश पवार, अविनाश लोंढे,भीमा शिंदे,जनसंपर्क अधिकारी बळीराम कोकाटे,अक्षय जोशी,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.