मूर्तिज़ापुर :- मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षा कडे आकर्षित करण्याकरिता आपले जीवन वेचणारे सर सय्यद अहमद खान यांचे जयंती नगर परिषदेच्या सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेत दिनांक 17ऑक्टोबर 2018 संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर हुसेन खान होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये समाजातील समाज बांधव व शालेय कर्मचारी उपस्थित होते सर सय्यद अहमद खान यांचा अलिगड मुस्लिम विश्व विद्यालय निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा होता समाजाकरता व समाजाला सुशिक्षित करण्याकरिता सर सय्यद अहमद खान यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यांनी समाजाला दिलेले मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचे ठरले
असून त्यांना अभिवादन करण्याच्या दृष्टीने व त्यांनी समाजावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन सर सय्यद अहमद खान उर्दू नपा प्राथमिक शाळेत करण्यात आले होते या वेळेस विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे सदर शाळेला मूर्तिजापूर येथील युवा समाजसेवक मोहम्मद रिजवान सिद्दिकी व त्यांचे स्नेही मुजाहिद खान मोहम्मद मुदस्सीर फैसल दानिश मोहम्मद मुजम्मिल शहाबुद्दीन व इतर मान्यवरांनी शाळेला सर सय्यद अहमद खान यांची प्रतिमा भेट दिली ही प्रतिमा देण्यामागचा उद्देश प्रगट करताना रिजवान सिद्दिकी यांनी आमचे प्रतिनिधीला सांगितले की ज्या व्यक्तीने समाजाकरता आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्या व्यक्तीची प्रतिमा विद्यार्थ्यांसमोर नेहमीकरता राहिल्यास त्यांच्यापासून समाजाला मार्गदर्शन व योग्य दिशा मिळू शकतो कार्यक्रमाचे संचालन बशारत यांनी केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेच्या सर्व कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

