चोरीच्या मोटरसायकली जप्त, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक


यवतमाळ(प्रतिनिधी) :  अवधुतवाडी पो.स्टे.ला आज दि. 13 रोजी फिर्यादी तुषार नारायणराव राठोड रा. श्रीकृष्ण नगर यवतमाळ याने दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, त्याच्या मालकीची एमएच 29 एवाय 9955 क्रमांकाची मोटर सायकल श्रीकृष्ण नगर दारव्हा रोड येथून चोरी गेली. अवधुतवाडी पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी मोटरसायकल चोरी बाबत शोध पथकाला मार्गदर्शन करुन आदेश दिले.

त्या आदेशानुसार विशेष पथकाने त्यांच्याकडील खबऱ्यांच्या नेटवर्कचा उपयोग करुन आजच चोरीस गेलेली पॅशन मोटर सायकल  29 एवाय 9955 क्रमांकाचे व दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक केली.

या दोन बालकांना अधिक कसून विचारणा केली असता त्यांनी चोरलेल्या इतर गाड्यांची माहिती दिली. स्प्लेंडर एमएच 29 एए 1301, एमएच 29 पी 9831, बजाज सीटी 100 एमएच 29 एल 8947 अशा एकुण चार मोटर सायकली या दोन्ही आरोपीकडून जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत 1 लाख 20 हजार आहे. आजच तक्रार व आजच चोरीचा तपास लागला आहे. या विशेष तपास पथकाचे प्रमुख सैयद साजीद तसेच अजय  डोळे, वासु साठवणे, रुपेश पाली, प्रदिप नाईकवाडे, योगेश डगवार, अजय ढोले, यांनी ही कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक मुकूंद कुळर्णी यांचे मार्गदर्शनात केली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post