के-हाळा गावातील वार्ड क्र 4 मधील रस्त्याच्या कामा साठी ग्राम पचायत ला. मुहूर्त सापडेना


  • भुषण महाजन

रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्यातील के-हाळा गाव म्हणायला तस चांगल परंतु ग्रामपचायत प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे वेशिला टागले स्वच्छ व सुंदर गावाचा पुरस्कार पटकावणाऱ्या रावेल तालुक्यातील के-हाळा गावाला  घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे.वार्ड क्र 4 मधील  रस्ते, अतिशय खराब झाल्याने रस्त्याची.वाट लागली आहे या कडे.मात्र ग्रामपचायत दुर्लक्ष करीत आहे  या बाबत  रिजवान टाईम्स ने आवाज उचलून वृत्त प्रसारीत केले  या बाबत सरपंच राहुल पाटील यांनी प्रतिनिधी शी,बोलताना 4-5 दिवसांत काम करण्याचे आश्वासन दिले मात्र ते आता फोल ठरले आहे यांनी वार्ड क्र 4 मधे जे सदस्य निवडून आले आहे ते मात्र फिरकुन पाहायला पण तयार नाही  आरोग्य केंद्राचा परिसर, गाव अंतर्गतसह दलित वस्तीच्या गटारी आदी सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाल्याने गावाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ व सुंदर गाव म्हणून ओळख असणाऱ्या गावाचा काही वर्षातच आदर्श गावाचा डोलारा ढासाळून पडला आणि गावच्या आदर्शाच्या पाऊलखुणा ही अदृश्य झाल्या.

 काही दिवसांपूर्वी वार्ड क्र 4 मधील  ग्रामस्थांनी  रस्त्यावर भराव  टाकण्यात यावा या बाबत तोडी तक्रारी दिल्या होत्या या बाबत प्रशासन आश्वासन देऊन सुध्दा काम केले नाही  ग्रा प सरपंच उपसरपच सदस्यांपुढे नागरिकांनी अस्वच्छतेचे पाढे वाचले होते. यावेळी रस्त्याचा प्रश्न घाणीचा विषय  ग्रामविकास अधिकारी व लोकप्रतिनिधींना निदर्शनात आले होते. यावेळी सरपंच यांनी सुध्दा  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना  चांगलेच फटकारले होते.
गावात  गटारी क्रॉसिंगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामावर बारीक नळ्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप देखील होत  आहे .


  • आंदोलनाचा इशारा 

वार्ड क्र 4 मधील रस्त्या कडे व
स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अकार्यक्षम प्रशासनाविरोधात ग्रामस्थांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. वेळीच ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रसिध्दी माध्यमातून नागरिकांनी दिला आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post