इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- समाजातील उपेक्षित,वंचित,कष्टकरी बांधवाना अनिष्ठ प्रथा व अंधश्रध्देतून बाहेर काढणार नाहीत तोपर्यंत विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार नाहीत.विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण महत्वाचे असून खरा इतिहास वाचून वास्तवात जगण्यासाठी वास्तववादी भूमिका घेऊन विवेकी विचार जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला सहकार्यवाह रुकसाना मुल्ला यांनी केले. उमरगा तालुक्यातील गंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उस्मानाबाद जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून प्रमुख वक्त्या म्हणून त्या 'वयात येताना.....आरोग्य व महिला' या विषयावर बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दामोदर पतंगे होते.या वेळी
प्रमुख म्हणुन अंनिसचे जिल्हा कार्याध्थक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,प्राचार्य डॉ.दिलीप कुलकर्णी,अदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रुकसाना मुल्ला म्हणाल्या की,खरे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी चांगले विचार आत्मसात करुन कृतीशील कार्यक्रम हाती घेवून आरोग्यकडे लक्ष दिले पाहिजे.सोशल मिडीयाच्या नांदात अधिक वेळ वाया घालण्यापेक्षा वैचारिक प्रगलब्धता वाढवून स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवावा अशा त्या शेवटी म्हणाल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.दामोदर पतंगे म्हणाले की,आपला देश जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.समाज परिवर्तनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन तरुणांनी जोपासणे गरजेचे आहे.राष्ट्रनिष्ठा, समाजनिष्ठा प्रत्येकाच्या अंगी असणे महत्वाचे आहे. यावेळी सेवा योजनेचे प्रतिनिधी अजय शिंदे व कु. शुंभागी गायकवाड यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी अंनिस व महाविद्यालय यांच्यात परस्पर सहकार्याचा करार,प्रतिकात्मक नकाशाचे व गोवर,रुबेला लसीकरण मोहीमेच्या पत्रकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.महेश मोटे यांनी 'अंनिस:भूमिका,वाटचाल व युवकांचा सहभाग' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राम कदम,डॉ.गुलाब
या कार्यक्रमास विविध शाखेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.