इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासुनच लोकशाहीचे बिज रुजवावे यासाठी उस्मानाबाद शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद शाळेत एक उपक्रम राबवण्यात आला आहे.यात लोकशाही काय असते,लोकशाहीचे महत्व व फायदे काय आहेत,मतदान नोंदणी,उमेदवार, उमेदवारासाठी घटनेतील तरतुदी,प्रचार यंत्रणा व नंतर मतदान प्रक्रीया कश्या प्रकारे होते याचे प्रात्यक्षीक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.निवडणुक प्रत्यक्षिके मध्ये 03 उमेदवार उभे करण्यात आले,ज्यात मतदार म्हणुन शंभर (100) विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उमेदवारांनी आपला प्रचार केला.मतदान प्रक्रीया ही पार पडली.व त्यातील उमेदवार शेख अरबिना नियाझ अहमद याने शंभर पैकी सत्तर (70) मते घेऊन विजयी बाजी मारली.या नंतर विजयी उमेवाराला प्रत्यक्षिकेत निवडणुक अधिकारी बनलेले नगरसेवक बाबा मुजावर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सम्मानीत करण्यात आले.विद्यर्थ्यांचा उत्साह व सहभाग या उपक्रम यशस्वी झाल्याचा दर्शवत होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून नगरसेवक बाबा मुजावर,सामाजिक कार्यकर्ते सय्यद शहनवाझ उस्मान,अदि उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व निरीक्षण संस्थेचे अध्यक्ष हाफीझ अलीमोद्दीन यांनी केले.या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.