इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सक्षम समाज घडविण्यात शिक्षकांचे बहुमोल योगदान आहे,असे प्रतिपादन सह्याद्रि फाऊंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.
सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद व चाईल्ड-लाईन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील लाल बहाद्दुर शास्त्री विद्या निकेतन शाळेत दि.24 सप्टेंबर रोजी शिक्षकरत्न व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व 1098 या टोल फ्री नंबरची जनजागृतीचा कार्यक्रम करण्यात आला.या प्रसंगी डॉ.दापके देशमुख दिग्गज बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. व्ही.बसवंत होते.तर प्रमुख म्हणुन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम,बाल कल्याण समितीचे सदस्य ए.ए.कोळगे,दादा कोरके,राजेश शिरगीरे,अदि उपस्थितीत होते.तसेच यावेळी सह्याद्री फाऊंडेशन्सचे संसथापक अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी 1098 या टोल फ्री नंबरची माहिती व महत्त्व सविस्तर सांगीतले.यावेळी राज्य शासनाच्या बाल रक्षा अभियानाची माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी. कदम यांनी दिली.यावेळी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षकांना शिक्षकरत्न व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोमटे सर यांनी केले तर आभार गजानन पाटील यांनी मानले.या कार्यक्रमास एस.व्ही.बनसोडे,एस.बी.यादव,श्रीमती आर.ए.शेख, आर.झेड.भिसे,एम.व्ही.गरड,यांच्यासह विद्यार्थी, नागरिक,संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.