अकोला :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्दोग मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदी युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा युवा उद्योजक विठ्ठल सरप पाटील यांची वर्णी लागली आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे उप सचिव डॉ.भोसले यांनी ही अधिसुचना जारी केली आहे.
मंबई खादी व ग्रामोद्दोग अधिनियम १९६० च्या कलम ७-अ (१) उपखंड (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन महारााष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्दोग मंडळाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब घुगे यांची तर अकोला जिल्हाप्रमुख म्हणुन विठ्ठल सरप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विठ्ठल सरप पाटिल यांना या मंडळाच्या माध्यमातुन युवकांना रोजगार मिळऊन देण्यासाठी ही चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी या नियुक्ती श्रेय युवासेना प्रमुख आदीत्यजी ठाकरे,राज्याचे उद्योगमंत्री सुभाषजी देसाई,आ.गोपीकिशनजी बाजोरीया,युवासेनेचे नेते वरूणजी सरदेसाई,आ.विप्लव बाजोरीया यांना दिले.