इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रउभारणीच्या कार्याबरोबर युवकांनी स्वत:मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत.आपले भविष्य आपल्या हातात आहे.स्वतःमध्ये असलेली जिद्य,चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर यश मिळतेच.जर देशाला सामर्थ्यसंपन्न बनवायचे असेल तर युवक वैज्ञानिक दृष्टया सक्षम बनला पाहिजे,असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी केले.
भानुदास चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती,उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने आयोजित 'वैज्ञानिक जाणीव जागृती अभियानांतर्गत' आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर होते.या वेळी प्रमुख म्हणुन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,जिल्हा प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर,अंनिस कार्यकर्ते राजाराम वेदपाठक, समीर शेख,उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अदि,उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माधव बावगे म्हणाले की,स्पर्धच्या काळात शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून गुणवत्ता,तंत्र-कौशल्ये,आत्मविश्वास वाढून स्वयमपूर्ण बनने गरजेचे आहे.स्वप्न मोठी पहा म्हणजे विकास मोठा होईल.तरुणांचे हे वय अतिशय महत्वाचे असून या वयातच चिकित्सात्मक वृत्ती निर्माण झाल्यास योग्य दिशा मिळते.जर या काळात योग्य दिशा मिळाली नाही तर आयुष्याची वाट लागते असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.त्यांनी विविध चमत्काराचे प्रयोग सादर करुन त्या पाठीमागील कार्य कारण भाव सउदाहरण स्पष्ट केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.व्ही.ए.तुंगे, प्रा.स्वाती निकम,प्रा.रुपाली कोटनुर,प्रा.अभिजीत सपाटे,प्रा.राजपाल वाघमारे,अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.महेश मोटे व सूत्रसंचालन विपुल गायकवाड यांनी केले तर आभार उप प्राचार्य प्रा.विरभद्रेश्वर स्वामी यांनी मानले.