सृजन समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान खुप मोठे आहे — आ.बसवराज पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सृजन समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान खुप मोठे असुन त्यांचा आचार व विचारापासुनच देश घडत असतो,त्यामुळे त्यांचा सन्मान झाला पाहीजे,असे प्रदिपादन औशाचे आ.बसवराज पाटील यांनी केले.

लोहारा पंचायत समिती व गटशिक्षण कार्यालयाच्यावतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.26 सप्टेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती ज्योतीताई पत्रिके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ.
बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील,पं.स.उपसभापती नमिता पाटील,जि.प.सदस्या शोभाताई तोडकरे,समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील,सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी,पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला,माजी जि.
प.सदस्य दिलीप भालेराव,पं.स.सदस्य वामन डावरे,
पं.स.माजी सभापती मदन पाटील,कॉग्रेस तालुका अध्यक्ष अँड.सुभाष राजोळे,राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,अँड. विश्वनाथ पत्रिके, शामसुंदर तोरकडे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख,
गटशिक्षणाधिकारी टी.एच.सय्यदा,पं.स.सदस्य व्यंकट कोरे,नगरसेवक आरीफ खानापुरे,ब्रह्मानंद पाटील, अदि,उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यात महानंदा चव्हाण(खेड),तानाजी दबडे(लोहारा),श्रीकृष्ण गाडेकर(उत्तर जेवळी),रमेश निंगशेट्टी(दक्षिण जेवळी),नागेश ढगे(भातागळी),
सोमनाथ चिनगुंडे(भोसगा),विश्वनाथ लोमटे
(सालेगाव उत्तर),किरण भुजंने(सालेगाव),एकनाथ शिंदे(आष्टा कासार),धनंजय संदीकर(नागुर),शिवराज सुतार(एकोंडी लो),सतिश माळी(राजेगाव),या शिक्षकांना 2017 — 018 या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार आ.बसवराज पाटील यांच्या हस्ते देवुन सन्मानित करण्यात आले.व तसेच सन 2015 — 016 व सन 2016 — 017 या दोन वर्षातील शिक्षक पुरस्कार मान्यनरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी टी.एच.
सय्यदा व सुत्रसंचालन विस्तार अधिकारी डी.एम.
जंगम यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी आर.
एच.चव्हाण यांनी मानले.या कार्यक्रमास शिक्षक व
नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post