- 70 वर्षा पासुन गावात ग्रामंपचायतच नाही
- कागदपत्रासाठी नागरिकांना भटकावे लागते वनवन
यवतमाळ : यवतमाळ जिल्हाच्या नकाशावरंनच दिघोरी व वरूड गाव गायब झाल्याची बाब उघडकीस आली असुन आज अध्यामिक गुरू प्रेमासाई महाराज यांच्या नेतृत्तात गावकर्यानी जिल्हाधीकार्याना निवेदन देवनु गावात ग्रामपंचायतीची मागणी केली आहे .दिघोरी व वरूड गाव हे स्वातंत्र्यप्राप्ती पुर्वीपासुन अस्तित्वात असुन या गावाना आज पर्यंत स्वंतत्र
किंवा गट ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला नाही .दिघोरी व वरूड गावातील नागरींकानी अनेकदा अडचणी माडल्या पंरतु कोणतेही आश्वासन पुर्ण केले नाहीत त्याचप्रमाणे महसुल मंत्री पालक मंत्री यांनाही निवेदन देवुन ग्रामपंचायतीची मागणी केली होती यामध्ये सुद्धा मंत्रीमहोदयानी केवळ आश्वासनेच दिली.दोन्ही गावातील शाळेत शिकणार्या विद्यार्थानांही अडचणी येवु लागल्याने आज अध्यामीक गुरू प्रेमासाई महाराज यांचे नेतृत्तवात जिल्हाधीकारी राजेश देशमुख यांना निवेदन देवुन ग्रामंपचायतीला मान्यता द्यावी अशी मागणी केली.
यावेळी गावातील अध्यामीक गुरू प्रेमासाई महाराज ,विश्वनाथ नागो कासार,सुरेश सियाराम येटी,बाबाराव नारायण राठोड ,सुशील रामराव राठोड ,विष्णु ज्योतीराम राजुरकर ,गुणवंता राठोड ,अविनाश प्रेम जाधव ,हितेश किसनदास राठोड ,सुनील हरीभाऊ राठोड ,प्रविण दुलीसिग राठोड ,सतीष राजुदास जाधव ,राजेश बाबुसिगं राठोड ,बबन दिगाम्बर राठोड , राहुल गणेश डिवरे ,स्वप्नील सुखेव कासार पुष्पदिप रामेश्वर राठोड ,मारोती साहेबराव राठोड ,अजय देवराव जाधव,नंदलाल गिरीधारी यासह गावातील शेकडो नागरीक उपस्थीत होते.