- नगरसेवकांचे जिल्हाधिकारींना निवेदन
विशेष प्रतिनिधि मक़सूद अली
यवतमाळ: यवतमाळ नगर परिषदेची हद्दवाढ झालेल्या गावांसाठी आलेला विकास निधी खर्च करतांना लोकनियुक्त नगरसेवकाने सुचविलेली विकास कामे प्राधान्याने करून देण्याबाबत व तो निधी चाच गावात खर्च होईल याची खबरदारी घेण्याबाबतचे निवेदन 12 सप्टेंबरला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशुख यांना व नगर रचनाकार, नगर रचना विभाग यवतमाळ यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी प्रभाग 10 चे नगर सेवक जावेद परवेज़ अन्सारी,व बबली भाई,प्रभाग 26 लोहारा चे नगरसेवक प्रा.बबलु देशमुख, प्रभाग 5 वाघापूरच्या वैशाली सवाई, विशाल पावडे, प्रभाग 22 उमरसराच्या दर्शना इंगोले, न.प.चे विरोधी पक्षनेता चंद्रशेखर चौधरी उपस्थित होते.
हद्दवाड झालेल्या क्षेत्राच्या विकासकरीता पहिल्या टप्प्यात 14 कोटी रूपये ची तरतुद केल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे, हद्दवाढ क्षेत्रातील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असल्याने या परिसरात कुठले काम प्राधान्याने केली पाहिजे याचा अभ्यास असल्याने हा निधी खर्च करताना आम्ही सुचविलेली कामे प्राधान्याने करावी तसेच हा निधी हद्दवाढ क्षेत्रातील गावाकरीताच खर्च व्हावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.